About AhiNest

AhiNest ची सुरुवात कशी झाली ते जाणून घ्या Ahilyanagar जिल्ह्यातील trusted, local property listings एकाच ठिकाणी, Sangamner पासून सुरुवात.

 मी संगमनेर तालुक्यातच राहतो. काही महिन्यांपूर्वी माझ्या गावाकडच्या एका मित्राला भाड्याने घर हवं होतं. आम्ही दोघं संगमनेरमधल्या जवळपास प्रत्येक गल्लीबोळात फिरलो कुठे “Flat Rent वर देणे आहे” किंवा “Room Rent वर देणे आहे” असे बोर्ड दिसतात का ते बघत. ओळखीच्या लोकांना फोन करून विचारलं. जवळपास आठवडाभर हे चाललं, 15 पेक्षा जास्त घरं बघितली कधी घर पसंत पडायचं नाही, कधी रेंट परवडायचा नाही. शेवटी बऱ्याच शोधाशोधीनंतर एका चांगल्या ठिकाणी त्याला घर मिळालं.

 या अनुभवानंतर ऑनलाईन पण शोधून बघितलं. पण तिथेही तीच गोष्ट काही पोर्टल्सवर listings दिसतात, पण त्यातली माहिती चुकीची निघते किंवा ती प्रॉपर्टी आधीच दिली गेलेली असते. Facebook, Instagram वर बघितलं तर तिथेही प्रॉपर्टीचे भरपूर posts आणि videos दिसतात, पण आपल्या भागातली, आपल्या गरजेची, खरी माहिती नेमकी शोधायला गेलं की सापडत नाही.  म्हणजे मुद्दा असा होता एक असं ठिकाण हवं होतं जिथे Ahilyanagar जिल्ह्यातल्या local properties trusted माहितीसह एकाच जागी असतील, आणि घर शोधणाऱ्याला माझ्या मित्रासारखं आठवडाभर गल्लोगल्ली फिरावं लागू नये. यातूनच AhiNest ची कल्पना सुचली.

AhiNest काय आहे

AhiNest हे Ahilyanagar जिल्ह्यातलं एक local property portal आहे जिथे घर, प्लॉट, दुकान शोधणाऱ्या प्रत्येकाला trusted आणि खरी माहिती एकाच ठिकाणी मिळते: प्रॉपर्टी owners थेट त्यांची listing इथे टाकू शकतात. सोबतच, तालुक्यातल्या local property consultants ना ही आम्ही AhiNest वर आणलंय, जेणे करून त्यांच्याकडे असलेल्या properties सुद्धा सगळ्यांना एकाच जागी बघता याव्यात,  प्रत्येक listing आणि प्रोफाईल पडताळून घेतली जाते, जेणे करून चुकीची माहिती किंवा आधीच दिलेली प्रॉपर्टी दाखवली जाणार नाही.  कोणाला प्रॉपर्टी हवी असेल आणि ती इथे listed नसेल, तरी आम्ही योग्य owner किंवा consultant शी जोडून देतो.

आमचं Mission

👉 Ahilyanagar जिल्ह्यातल्या लोकांना घर/प्लॉट/दुकान शोधणं सोपं करणे 👉 जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातली खरी, trusted प्रॉपर्टी माहिती एका ठिकाणी आणणे 👉 शोधणाऱ्याला कुठेही प्रत्यक्ष फिरत बसावं न लागता योग्य पर्याय मिळवून देणे.

आम्ही वेगळे का?

 आजकाल ऑनलाईन खूप पर्याय आहेत — मोठे पोर्टल्स, Facebook groups, Instagram वर च्या video/posts. पण यातल्या बहुतेक ठिकाणी माहिती जुनी असते, प्रॉपर्टी आधीच गेलेली असते, किंवा नेमकं आपल्या भागातलं, आपल्या गरजेचं काही सापडत नाही.   AhiNest फक्त Ahilyanagar जिल्ह्यावर आणि इथल्या 14 talukas वर फोकस करतं, आणि प्रत्येक listing verify करूनच टाकतो. त्यामुळे इथे जे दिसतं ते खरं आणि उपलब्ध असतं शोधणाऱ्याला वेळ वाया घालवावा लागत नाही.

पुढे काय?

 आत्ता सुरुवात संगमनेर तालुक्यापासून झाली आहे. पुढच्या काळात टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातल्या सगळ्या १४ तालुक्यांमध्ये पोचायचं आहे,  जिथे कोणालाही घर-प्लॉट-दुकान हवं असेल किंवा द्यायचं असेल तर पहिला विचार AhiNest चाच यावा, आणि इथे मिळणारी माहिती नेहमीच trusted आणि up-to-date असावी.  तुमची प्रॉपर्टी थेट इथे लिस्ट करा, किंवा तुम्ही property consultant असाल तर AhiNest वर यायचं असेल तर संपर्क करा — किंवा तुम्हाला Ahilyanagar जिल्ह्यात घर/प्लॉट/दुकान हवं असेल किंवा भाड्याने/विक्रीसाठी द्यायचं असेल आम्ही मदत करू.  Consultant Registration | List Your Property | Contact Us

Scroll to Top